Tuesday, November 26, 2024
Homeमनोरंजन'बाहुबली' सिरीज पुन्हा होणार प्रदर्शित

‘बाहुबली’ सिरीज पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात चित्रपटगृहे बंद होती. पण आता राज्यातील चित्रपटगृहे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जुने सिनेमे सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

एसएस राजामौली यांचा सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ आता पुन्हा एकदा सिनेमागृहात रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना बाहुबली सिनेमा सिरीजमधील भव्यदिव्यता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. करण जोहरने आज ट्विटरवरुन याची माहिती दिली.

करण जोहरने आज ट्विट करत म्हंटले आहे कि, “जादू पुन्हा उलघडण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रभास स्टारर बाहुबली या सीरीजचे दोन्ही सिनेमे लवकरच पुन्हा प्रदर्शित करण्यात येतील.

दरम्यान बाहुबली सिनेमाचा पहिला भाग या शुक्रवारी प्रदर्शित करण्यात येईल. तर दुसरा भाग पुढील शुक्रवारी प्रदर्शित होईल.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे थिएटर मालकांवर आर्थिक संकट कोसळले होते. याकाळात अनेक मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले होते. आता राज्यात ६ नोव्हेंबरपासून चित्रपटांचे नियमित शोज सुरु करण्यात येणार आहेत.

काय असेल नियमावली

चित्रपटगृहात केवळ ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक आहे.

चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे.

प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावे.

आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा.

थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे.

फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या