दिल्ली | Delhi
भारत चीन वादाचा फटका चीनची मोबाईल उत्पादक कंपनीत विवो Vivo ला देखील बसला आहे. बीसीसीआयने Vivo सोबत असलेला मुख्य प्रायोजकचा करार रद्द केला आहे.
- Advertisement -
Vivo आणि बीसीसीआयमध्ये हा करार 5 वर्षासाठी झाला होता. पण तो दोन वर्षातच रद्द करण्यात आला. बीसीसीआयने देखील दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने मेल करून याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने मेल मध्ये म्हंटले आहे की, ” भारतीय क्रिकेट बोर्ड आणि विवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सोबत मिळून 2020 च्या इंडियन प्रीमियर लीग साठी दोघांमधील करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.”