Saturday, July 27, 2024
Homeनाशिकपहिणे येथील निसर्ग सौंदर्य खुलले

पहिणे येथील निसर्ग सौंदर्य खुलले

त्र्यंबकेश्वर : Trimbakeshwer

तालुक्यातील हॉट डेस्टिनेशन म्हणून ओळख असलेल्या पहिने बारीचे निसर्ग सौंदर्य खुलले असून झाड, फुल, लहान लहान झरे यांना बाहेर आला आहे.

- Advertisement -

परंतु सदर परिसरात कोरोना च्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. प्रसिद्ध पहाणे बारीचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे.

दरम्यान तालुक्यात फारसा पाऊस नसला तरी सुरवातीच्या पाऊसामुळे येथील निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. जुन महिन्याच्या प्रारंभीस पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर उघडीप दिलेल्या पाऊसाने चांगली झालेली नाही. परंतु येथील डोंगर, निसर्ग खुललेला असून हा खुललेला निसर्ग पाहण्यासठी पहिने बारीत भटकंती करणाऱ्यांना बहर आला आहे. त्र्यंबकेश्वर शहराच्या परिसरासह पहिनेबारी, तोरंगण घाट, दुगारवाडी, ब्रह्मगिरी, अंजनेरी आदी परिसरात निसर्ग सहलींसाठी येणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिस आणि महसूल यंत्रणा सज्ज असून हौशी पर्यटकांवर कडक करवाई करण्यात येणार आहे.

दरवर्षी या परिसरात पर्यटकांची गर्दी दिसून येते परंतु यंदा मात्र करोना संकटामुळे प्रशासनाने पर्यटकांना पर्यटनास मनाई केली आहे. त्यामुळे सदर परिसरात त्र्यंबकेश्वर व वाडीवेऱ्हे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या