Saturday, September 26, 2026
Homeजळगावहृदयद्रावक घटना ; पोटच्या चिमुरडीला गळफास देत जन्मदात्रीनेही केली आत्महत्या

हृदयद्रावक घटना ; पोटच्या चिमुरडीला गळफास देत जन्मदात्रीनेही केली आत्महत्या

जळगाव – jalgaon

शहरातील हरीविठ्ठलनगरमधील एका 36 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घराच्या तिसर्‍या मजल्यावर 8 वर्षीय चिमुडीला गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि.24 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

सोनाली दीपक दाभाडे (वय 36), तेजस्विनी दीपक दाभाडे (वय 8) असे मयत आई व मुलीचे नाव आहे. पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात आणि हरिविठ्ठलनगर भागात ते इतर दोन भावांसह वास्तव्याला आहेत. दीपक दाभाडे हे रविवार, दि.24 रोजी नोव्हेंबर रोजी भावांसह नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ येथे गेलेले होते. त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते. त्यांनी रविवारी सकाळी 9 वाजेनंतर मुलीला एका स्कार्फने गळफास देऊन स्वतः सोनाली दाभाडे यांनी दुसर्‍या स्कार्फने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुपारी 12 वाजेच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिसर्‍या मजल्यावर पती दीपक दाभाडे गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता. तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह पाहताच त्यांना एकच धक्का बसला व त्यांनी हंबरडा फोडला.

नातेवाईकांनी तत्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांना दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्या दोघांना मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने...

0
नाशिक | Nashik खरीप हंगाम-२०२६ मध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १० तालुक्यांत प्रथम कळ (Trigger-1) लागू करण्यात आला आहे....