Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारअंध तरुण बनले सुपर थेरपिस्ट

अंध तरुण बनले सुपर थेरपिस्ट

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

जागतिक योग दिनानिमित्त (World Yoga Day) ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान (Rural Workers Establishment) संचलित स्वाधार दिव्यांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातील (Swadhar Divyang Skill Development Training Center) अंध युवकांनी जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सादर केला. या अंध विद्यार्थ्यांनी योगासन व उपचार थेरपीचे प्रात्यक्षिक (Yogasana and Healing Therapy Demonstration) करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

- Advertisement -

योगा दिनानिमित्त स्वाधार केंद्रात अवगत केलेल्या कौशल्याचे प्रात्यक्षिक दिले. फूट मसाज, हेड मसाज, रिफ्लेक्सोलॉजी असे विविध अ‍ॅक्यूप्रेशर मसाजचे प्रकार करून दाखवले.

अंध असूनही त्यांनी योगासनाचे कौशल्य अवगत केले आहे आणि आपले आरोग्य जोपासण्यासाठी ते नियमित योगासने करतात. अंध युवकांपासून प्रेरणा घेऊन नियमित योग अभ्यास करावा व आपले आरोग्य जतन करावे याकरिता हा विशेष कार्यक्रम आयोजित करत असल्याचे ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत सुडे यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक संतोष वसईकर, पत्रकार धनराज माळी, राकेश कलाल, दिनू गावीत, स्काय जिमचे संचालक आकाश पाने, आदी उपस्थित होते.

अंध युवकांना क्युप्रेशर आणि मसाज थेरपीचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देऊन उत्तम मसाज थेरपिस्ट बनवण्याचे काम स्वाधार केंद्रांमध्ये होते. नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस अंध युवकांना स्वाधार केंद्राने क्युप्रेशर मसाजचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. हे युवक आता विविध आजारांनी त्रस्त रुग्णांना सेवा देऊन रोजगार मिळवत आहेत व वेदना मुक्तीचे आरोग्य संवर्धनाचे महत्त्वपूर्ण असे काम करत आहेत.

वाढत्या जीवनशैली आजारामुळे अनेक प्रकारच्या व्याधी जडतात. यावर क्युप्रेशर मसाजचे उपचार अत्यंत प्रभावी ठरतात. त्यामुळे या युवकांना चांगला रोजगार मिळत आहे. अ‍ॅक्यूप्रेशर व मसाज चिकीत्सेचा लाभ सुपर थेरपिस्ट सेंटर कडून नंदुरबारानीं घ्यावा असे आवाहन स्वाधार केंद्रामार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाधारचे कर्मचारी विनायक सोनावणे, गिरीश निकम, शाहरुख शेख, दीपक भोई आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या