Friday, June 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजम्हसरूळच्या सीतासरोवरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

म्हसरूळच्या सीतासरोवरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

 

 

- Advertisement -

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

म्हसरूळ परिसरातील सीतासरोवरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते . त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.पोलिस यंत्रणेला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून या परिसरात काही संशयास्पद हालचाल झाली होती का याबाबत चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी याबाबत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. सदरची घटना ही घातपात आहे की अपघात हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाणे पुढील तपास करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...