Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : सप्तशृंगी गडाच्या जंगलात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Nashik News : सप्तशृंगी गडाच्या जंगलात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptshringigad

येथील सप्तशृंगी देवीच्या (Saptshringi Devi) तांबुलतीर्थ कुंडाच्या डाव्या बाजूला जंगलात उंबराच्या झाडाला ३० ते ३५ वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवार (दि.२५) रोजी सकाळी सदर सप्तशृंगी गडावर (Saptshringi Gad) सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांना जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना उंबराच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.यानंतर डॉ. प्रशांत बहिरम यांच्या देखरेखीखाली पंचनामा करून मृतदेहाची तपासणी करण्यात आली.

दरम्यान, त्यानंतर कळवणचे पोलिस निरिक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गद्शनाखाली त्याठिकाणीच मृतदेह दफन करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी शरद शिंदे, आदेश भामरे, निलेश शेवाळ, सचिन राऊत करत आहेत.

सदर घटनास्थळी पोहचल्यानंतर अनोळखी पुरुषाचा मृतदेह नायलॉन दोरीच्या सहाय्याने उंबराच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, मृतदेह १० ते १२ दिवसांचा असल्याने ओळख पटणे अवघड आहे.

सोपान शिरसाठ, पोलीस निरीक्षक, कळवण

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...