Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकबेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला

बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला

घोटी । जाकीर शेख Ghoti

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील ३२ वर्षीय एक महिला पाच दिवसांपासून बेपत्ता झाली होती. या महिलेचा मृतदेह पिंपळगाव येथील बोरीची वाडी परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. झूणकाबाई दशरथ भले, वय ३२ असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

गेल्या पाच दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याबाबत घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर महिलेचा मृतदेह सापडल्या नंतर घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

याप्रकरणी संबंधित घटनेत ५ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तातडीने मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन हा गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून संबंधितांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...