Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारछिन्नविछीन्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला

छिन्नविछीन्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

तालुक्यातील बिलाडी ते नारायणपूर रस्त्यावर एका २५ ते ३० वर्षीय तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीसांत नोंद करण्याची कारवाई सुरु होती.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील बिलाडी-नारायणपूर Biladi-Narayanpur रस्त्यावर आज दि.२६ ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे २५ ते ३० वयाच्या अनोळखी तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, Ravindra Kalmakar, Inspector of Police, Local Crime Branch शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील Police Inspector Sandeep Patil घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कारवाई सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या