Saturday, April 26, 2025
Homeधुळेवरपाडा येथे मुलाने केला वडिलावर प्राणघातक हल्ला

वरपाडा येथे मुलाने केला वडिलावर प्राणघातक हल्ला

धुळे ।dhule। प्रतिनिधी

गावात रिकामा फिरू नको, काहीतरी कामधंदा कर असे सांगितल्याच्या रागातून मुलाने (boy)वडिलावर (father) कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला (Assault) करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना साक्री तालूक्यातील वरपाडा (Warpada) येथे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

- Advertisement -

वरपाडा पो. नवापाडा ता. साक्री येथे राहणारे चिमन चैत्राम ठाकरे (वय 55) यांनी त्यांचा मुलगा महेंद्र ठाकरे (वय 30) याला तु गावात नुसता रिकामा फिरत असतो, काही एक कामधंदा करीत नाही, काहीतरी कामधंदा कर, असे समजावून सांगितले. त्याचा राग येवून महेंद्र याने काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चिमन ठाकरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कुर्‍हाडीने डोक्यावर वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

ही बाब लक्षात येताच ग्रामस्थ धावून आले. त्यांनी ठाकरे यांना रूग्णालयात दाखल केले. तर याप्रकरणी चिमन ठाकरे यांच्या फिर्यादीवरून महेंद्र ठाकरेविरोधात भादंवि 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास एपीआय गायकवाड हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...