Tuesday, April 1, 2025
HomeनगरShrirampur : अंघोळीला गेलेल्या मुलाचा टॉवेल पुन्हा पेटला

Shrirampur : अंघोळीला गेलेल्या मुलाचा टॉवेल पुन्हा पेटला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबियांच्या घरातील वस्तूंनी दोन दिवसांपूर्वी आपोआप पेट घेतला होता, दोन दिवसानंतर पुन्हा रविवारी त्याच घरात अंघोळीसाठी गेलेल्या मुलगा प्रथमेश हिंगणे याचा टॉवेल पूर्णता पेटला. या घटनेमुळे पुजारी कुटुंब पूर्णतः घाबरून गेले आहे. बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगड येत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला.त्यानंतर दगड येणे बंद झाली व त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या. घरातील गादी, उशी प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या. त्यानंतर दोन दिवस कुठलाही प्रकार घडला नव्हता. परंतू रविवारी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता त्यांचा मुलगा अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला असता त्याचा टॉवेल पूर्ण पेटला. तसेच त्याचा शर्टही थोडासा पेटला व त्याच्या पाठीला देखील भाजलेले आहे.

- Advertisement -

त्यामुळे दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेतून सावरत नाही. तोच पुन्हा काल आग लागण्याचा प्रकार घडल्यामुळे पुजारी कुटुंब पूर्णतः हवालदिल झाले आहे. ही माहिती समजताच बेलापूर पोलीस औट पोस्टचे स.पो. नि. सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, अंनिस कार्यकर्ते देविदास देसाई यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट दिली. पुजारी कुटुंबियांच्या मतानुसार घरात एखादा कपडा टाकला की तो आपोआप पेटतो. परंतू पोलिसांनी घरात कपडा ठेवून एक तास वाट पाहिली परंतू कुठलाही आग लागण्याचा प्रकार घडला नाही. त्यामुळे घरात कुणी नसताना हा प्रकार घडत आहे. यामागे नेमका कोणाचा हात आहे? याचा शोध आता पोलीस घेणार आहेत. कारण काही असो परंतू बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंब मात्र पूर्णतः दहशतीखाली वावरत आहे. त्यांचे सामान गेल्या तीन दिवसापासून घरासमोरच टाकलेले आहे. त्यांना घरात देखील जाता येत नाही. घरात गेले की एखादी वस्तू पेटते काय? अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे.

दिवस-रात्र हे कुटुंबीय या भानामतीसदृश भितीखाली जगत आहे. हा प्रकार नेमका काय आहे? त्याचा शोध लावण्याची गरज आहे. या घरातील सर्व सामान बाहेर काढल्यानंतर बेलापूर खुर्द ग्रामपंचायतने संपूर्ण घर धुवून काढले होते. त्यानंतर दोन दिवस कुठलाही प्रकार घडला नाही. परंतू रविवरी पुन्हा आग लागण्याची घटना घडल्याने पुजारी कुटुंबीय घाबरून गेले आहे. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. या प्रकरणाचा उलगडा केव्हा होतो? या प्रतीक्षेत पुजारी कुटुंबीय त्याचबरोबर बेलापूर खुर्द ग्रामस्थ आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : भीषण अपघात एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील विळद घाटात एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात...