Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिकच्या तुफान गर्दीत 'द बर्निंग कार'; मोठा अनर्थ टळला

नाशिकच्या तुफान गर्दीत ‘द बर्निंग कार’; मोठा अनर्थ टळला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नेहरू गार्डन परिसरात Nehru Garden Area सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन एम- एच -१५ बीइ- १९०७ वाहनाने अचानक पेट घेतला car on fire. यात नाशिकरोड येथील अनंत पडवळ याच्या सह त्याची पत्नी, मुले होते.

- Advertisement -

गाडीच्या इंजिनच्या पुढील भागात शॉर्ट सर्किट मुळे धूर निघत असल्याने नागरिकांनी तात्काळ गाडीतील मंडळींना गाडी बाहेर काढले.

यावेळी बंदोबस्ताला असलेले पोलीस व अग्निशामक दलाच्या एका बंबाने त्वरित आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. बुधवरी (दि ३) शालिमार परिसरात नागरिकांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती. मात्र लागलीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या