Thursday, May 30, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळली, १८ जखमी

सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळली, १८ जखमी

सप्तश्रृंगी गड | वार्ताहर | Saptashrngi Gad

सप्तश्रृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) बस थेट दरीत कोसळली आहे. यात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांचेवर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

- Advertisement -

बस सप्तशृंगीगडावरून खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलिस प्रशासन, ग्रामस्थ, आपत्ती व्यवसथापन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत महिलेच्या परिवाराला एसटी महामंडळाकडून १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला वाढता विरोध

- Advertisment -

ताज्या बातम्या