Saturday, May 25, 2024
Homeनाशिकसहा ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सहा ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सिन्नर | प्रतिनिधी

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी १६ ऑक्टोबरपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ होत असून पाच नोव्हेंबरला मतदान तर सहा नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी दिली.

- Advertisement -

मीठसागरे येथील प्रभाग १ मधील सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सदस्य मयत झाल्याने, चोंढी येथील प्रभाग दोन आणि तीनमधील अनुसूचित जमाती महिलेच्या जागेवर नामनिर्देशन पत्र न आल्याने या जागा रिक्त आहेत.

गुळवंच येथील प्रभाग एकमधील सर्वसाधारण स्त्री उमेदवार मृत झाल्या आहेत. पाथरे खुर्द येथील प्रभाग दोनमधील अनुसूचित जमातीचे सरपंचपद सदस्य मृत झाल्याने रिक्त आहे. मानोरी येथील प्रभाग दोन नामाप्र गटातील महिलेची पोलीस दलात निवड झाल्याने, तर भरतपूर (लक्ष्मणपूर) येथील प्रभाग दोनमधील नामाप्र स्त्रीची जागा जातपडताळणीमुळे रिक्त आहे. त्यामुळे मीठसागरे, गुळवंच, पाथरे खुर्द, मानोरी, भरतपूर येथे प्रत्येकी एक तर चोंढी ग्रामपंचायतीमध्ये दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या