Monday, April 28, 2025
Homeजळगावताबा सुटल्याने कार घरावर आदळली

ताबा सुटल्याने कार घरावर आदळली

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

भरधाव कारवरील ताबा सुटल्याने थेट घराच्या कंपाऊंडवर आदळल्याची घटना रविवारी 18 जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हे नगर परिसरात घडली आहे. यात सुदैवाने कारच्या एअरबॅग उघडल्याने कारमधील दोघे बचावले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाव्हती. शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कोल्हे नगर येथे राजेंद्र भांगळे यांचे घर आहे.

- Advertisement -

रविवारी 18 जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुने भगवान नगरकडून कार क्रमांक (एमएच 19 ईजी 1778) ही कोल्हेनगरकडे भरधाव वेगाने येत होती. त्यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट राजू भंगाळे यांच्या घराच्या कंम्पाऊंच्या भींतीवर जावून आदळली. या घटनेत सुदैवाने कारमधील दोघेजण बॅग उघडल्याने बचावले आहे. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. जवळच कॉलेज असल्यामुळे हा रस्त नेहमी वर्दळीचा असतो, रविवार असल्याने रस्त्यावर कुणीच नव्हते. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. यावेळी क्रेनच्या मदतीने फसलेली कार बाहेर काढण्यात आली.

…तर मोठी दुर्घटना घडली असती

कारचा अपघात होण्या काही मिनिटांपुर्वी भंगाळे यांच्या घराच्या घराचे काही किरकोळ काम सुरु होते. त्याठिकाणी सकाळ पासून काही मजूर काम करीत होते. दुपारी घटना घडण्याच्या काही मिनिटांपुर्वी मजूर काम आटोपून निघून गेले असल्याने मोठी होणारी दुर्घटना टळल्या

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...