Monday, July 22, 2024
Homeजळगावनियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली ; एक जण जागीच ठार

नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली ; एक जण जागीच ठार

अमळनेर – प्रतिनिधी amalner

- Advertisement -

नियंत्रण सुटल्याने मालपूरकडे जाणारी कार झाडावर आदळल्याने (accident) एक जण जागीच ठार तर दोघांचे पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

वणी बस दुर्घटनेत अमळनेर तालुक्यातील महिला ठार

योगेश पांडुरंग पाटील (रा.मालपूर) हा कुलदीप विकास पाटील व त्याचे मेव्हणे (नाव माहीत नाही), आणि एक लहान मुलगा घेऊन मापूरकडे कार घेऊन निघाला होता. नियंत्रण सुटल्याने हॉटेल चिन्मय जवळ कार झाडावर आदळल्याने योगेश जागीच ठार झाला. इतर दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले. लहान मुलाला मात्र साधे खरचटले सुद्धा नाही. डॉ इम्रान कुरेशी यांनी प्राथमिक उपचार करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या