Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्राने शेतकरी विरोधी भूमिका सोडावी

केंद्राने शेतकरी विरोधी भूमिका सोडावी

मुंबई । प्रतिनिधी

शेतकऱ्याच्या पोटाला जेव्हा चिमटा बसतो तेव्हाच तो रागाने रस्‍त्‍यावर येतो आणि आंदोलन करतो.कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे असेल तर शेतकरी या विधेयकाच्या विरोधात रस्‍त्‍यावर उतरला नसता याकडे लक्ष वेधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केंद्र सरकारला कृषी विधेयकावर आपला हट्ट सोडण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

शेतकरी इतक्‍या मोठया प्रमाणात रस्‍त्‍यावर येतो तेव्हा केंद्राने हटवादाची भूमिका बाजूला ठेवून समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे.शंभर टक्‍के आमचेच खरे,आम्‍ही बोलू तीच पूर्वदिशा हे लोकशाहीत चालत नाही,असा टोलाही त्‍यांनी लगावला.

देशातील शेतकरी विधेयक रद्द करा अशी मागणी करत आहे. यामध्ये विरोधी पक्षांना राजकारण करायचे नाही. कडाक्‍याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकर्‍यांना घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत,असे पवार म्हणाले.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी राष्‍ट्रपतींची भेट घेतली आहे. त्यावेळी शरद पवार यांनी विधेयकावर काय केले पाहिजे हे सविस्तर मांडले आहे. केंद्रातील वरिष्ठ मंत्री शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत, परंतु तोडगा अजून निघत नाही. केंद्र सरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे. मात्र केंद्राकडून अजून स्‍पष्‍टता येत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या