Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा

- Advertisement -

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी उद्यापासून दोन दिवस २७ ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान मुंबई दौ-यावर राहणार आहेत.

२७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

२८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या