Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGold Silver Price : सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासूनच...

Gold Silver Price : सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासूनच दर लागू

नवी दिल्ली | New Delhi

इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाची झळ आता जगासह भारताला बसत असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसेच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन केलं आहे. दरम्यान या आवाहनानंतर केंद्र सरकारने सोने,चांदीवरील आयातशुल्क ६ टक्क्यावरून १५ टक्के करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोन्यावरील ‘मूलभूत सीमा शुल्क’ (Basic Customs Duty – BCD) ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर ५ टक्के ‘कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर’ (AIDC) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे असे एकूण १५ टक्के आयातशुल्क लागू करण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यापार्‍यांना बसणार आहे.

दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात देखील आज या निर्णयाचा परिणाम दिसण्याची शक्यता असून सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे. सरकारने जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील एकूण आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केले होते. या कपातीमध्ये मूलभूत सीमा शुल्क (BCD) १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत करण्यात आले होते तर उपकर (AIDC)५ टक्क्यांवरून १ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, आता हे दोन्ही शुल्क पुन्हा वाढवण्यात आले आहेत.

सोने, चांदीच्या दरात आज कितीने वाढ?

आज बाजारपेठ उघडताच सोने चांदीच्या दारात वाढ झाली आहे. काल (१२मे) रोजी सोन्याचे दर १,५१,००० होते. त्यात आज अकरा हजारांची वाढ होऊन सोन्याचे हेच दर १,६२,००० वर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात तब्बल ३० हजारांची वाढ होऊन हेच दर २,९८,००० वर पोहचले आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

0
मुंबई । Mumbai "ज्या देशात अन्नदाता सुखी नसतो, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. परंतु आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने उलटे चित्र पाहायला मिळत आहे....