Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसंत तुकाराम महाराजांच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

संत तुकाराम महाराजांच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

पुणे | प्रतिनिधी Pune

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने रविवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेलाजागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथअशा भक्तिमय वातावरणात ३७५ वा बीज सोहळा संपन्न झाला. दुपारी बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.

- Advertisement -

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदाचा तुकाराम
महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी
राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी दाखल झाले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

पहाटे चार वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडारती झाली. पहाटे साडे पाच वाजता देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा आणि वैकुंठगमन स्थान येथील पूजा संस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि विश्वस्त यांच्या हस्ते झाल्या. प्रांत अधिकारी यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता हरीनामच्या गजरात पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात बापूसाहेब देहूकर महाराजांचे
वैकुंठगमन प्रसंगावर कीर्तन झाले. ‘घोंटविन लाळ ब्रह्मज्ञान्याहाती’ यावर आधारित कीर्तन झाले. फडकरी, वारकरी, मानकरी यांचा सत्कार झाला. साडे अकरा
वाजता पालखीची वैकुंठगमन मंदिराला प्रदक्षिणा झाली.

दुपारी बारापर्यंततुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून, मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अडीच लाखांहून अधिक भाविक बीज सोहळ्याला उपस्थित होते.

कडेकोट पोलीस बंदोबस्त
मंदिर परिसराच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्यात आला होता. मंदिर आवारात त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात होती.
कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. देहूत प्रवेश करणार्‍या मार्गावर सुरक्षा कठडे लावले होते. गावात वाहनांना प्रवेश बंद केला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...