निफाड। प्रतिनिधी Niphad
निफाड येथे अवकाळी पावसाने व गारपिटीने 3 ते 3.30 वाजेदरम्यान निफाड-येवला मार्गावरील हॉटेल नक्षत्रच्या समोरील जुने शिवरे रस्त्याच्या बाजूस अजय गणपतराव गोळे यांच्या शेतात ते पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने आपल्या भावांसोबत शेतात काढुन ठेवलेले उन्हाळ कांदे झाकण्यासाठी प्लॅस्टिक पेपर टाकत असताना भागवत अंबादास गोळे, प्रवीण संपतराव गोळे यांच्यापासून काही अंतरावर नारळाच्या झाडावर अचानक मोठा आवाज होऊन गोळे परिवाराला काही कळण्याच्या आतच वीज कडकडून पडल्याने नारळाचे झाड क्षणार्धात जळून खाक झाले.
गोळे परिवाराचा काळ आला होता परंतू वेळ आली नव्हती, असेच आजच्या या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतातील पिकाच्या संरक्षणासाठी काम करत असतांना ही घटना घडल्याने निफाडसह परिसरातील शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट व सोसाट्याचा वारा हा निफाड तालुक्यातील शेतकर्यांसाठी एक दृष्टचक्र निर्माण झाले आहे. त्यात भर आता वीजा शेतकर्यांच्या शेतात वा अंगावर पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.