Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedकफ सिरपचा रंग झाला 'पिवळा'!

कफ सिरपचा रंग झाला ‘पिवळा’!

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) शहरातील आरोग्य केंद्रावर येणाऱ्या रुग्णांसाठी खरेदी केलेले कफ सिरप निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. गुलाबी रंगाच्या कफ सिरपचा रंग अचानक पिवळा झाल्यामुळे आरोग्य विभागाने सिरपचे वाटप बंद केले आहे. या सिरपची अन्न व औषधी प्रशासनामार्फत (एफडीए) तपासणी केली जात असून त्यानुसार नमुने पाठविण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

- Advertisement -

सदरील कफ सिरप (Cough syrup) औषध एमआरपी दरापेक्षा निम्म्या किमतीत महापालिकेला पुरवठा करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने शहरात जलजन्य व कीटकजन्य आजारांचा दरवर्षी फैलाव होतो. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे अत्यावश्‍यक औषधी खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या ‘कफ सिरप’ (Cough syrup) या औषधीचा रंग गुलाबी असताना ते पिवळे पडल्याचे लक्षात येताच या खोकल्याच्या औषधाचे आरोग्य केंद्रामार्फत होणारे वाटप बंद करण्यात आले. यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, मार्च महिन्यात महापालिकेने ऑनलाईन पद्धतीने औषधी खरेदी केली आहे. त्यात कफ सिरपसोबत अँन्टीबायोटिक व इतर गोळ्यांचा समावेश आहे. आसूलवाडी या कंपनीकडून सहाशे कॅन खोकल्यावरील सिरप खरेदी करण्यात आले. यातील चार कॅनमधील औषधाचा रंग पिवळा पडल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने ही औषधी परत मागविण्यात आली. कंपनीला यासंदर्भात माहिती देण्यात आली. 

दरम्यान, कंपनीच्या प्रतिनिधींनी शहरात येऊन औषधीचे नमुने घेतले. त्यासोबत अन्न व औषधी विभागामार्फत या औषधीची तपासणी केली जात आहे. त्यासाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. ४९५ कॅन अद्याप महापालिकेच्या गोडाऊनमध्येच पडून असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या