Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआगामी काळ कसोटीचा

आगामी काळ कसोटीचा

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

यंदाच्या पावसाळ्याने (rain) आषाढातच गोदावरीने (godavari) आपले रौद्ररुप दाखवून दिले. अजून दोन महिने पावसाचेच आहे. पूर येऊन गेला आहे. धरणे 80 टक्के भरली आहे.

- Advertisement -

त्यामुळे यापुढे थोडाही पाऊस (rain) झाला तरी धरणातून (dam) पाणी सोडण्याशिवाय (water discharge) पर्याय राहणार नाही. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांंना कायम सावध राहावे लागेल. त्यातच पूर ओसरल्यानंतर कीटकजन्य आजारांचे संकट उभे राहते. यातून वेळीच मार्ग न काढल्यास व नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी (local bodies) दक्षता न घेतल्यास आजारांंचा धोका उद्भवू शकतो.

पावसाळ्यात डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria), चिकुनगुनीया (Chikungunya), हिवताप याबरोबरच दूषित पाण्यामुळे होणार्‍या गॅस्ट्रो (Gastro) आणि कॉलरा (Cholera) या आजारांचे रुग्णही वाढत असल्याने त्यांच्या प्रतिबंधासाठीही काळजी घेणे आवश्यक असते. अधूनमधून पाऊस सुरू झाला की डेंग्यूला सुरुवात होते आणि तो जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत मुक्कामी राहतो. सध्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे बरेच जण शहरात येऊन राहतात. त्यांना बाहेरचे अन्न खावे लागते. त्याचा दर्जा, स्वच्छता याकडे थोडेही दुर्लक्ष झाले तरी असे अन्न खावे लागलेले लोक हे टायफॉइडच्या (Typhoid) जाळ्यात अलगद सापडतात.

टायफॉइडमध्ये दर चार-सहा तासांनी थंडी वाजून ताप (fever) येणे, डोकेदुखी (headache), अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. काहींना पोटात दुखून जुलाबही होतात. हा आजार आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकतो. त्यातही चढत्या भाजणीने ताप चढत जातो, त्याला ‘स्टेप लॅडर पॅटर्न’ म्हणतात. विषाणूजन्य काविळचे रुग्णदेखील वाढतात. विषाणूजन्य काविळीत पोट दुखून जुलाब होणे, यकृताच्या जागी दुखणे, डोळे पिवळे होणे, अन्नावरची वासना जाणे, लघवी गर्द पिवळ्या रंगाची होणे अशी लक्षणे दिसतात.

गॅस्ट्रो, कॉलरा आणि लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण (Leptospirosis patients) वाढतात. म्हणून आरोग्य विभागावरच (Department of Health) ताण वाढतो. त्यासाठी प्रभावी जागृती गरजेची असते. दूषित पाणी (Contaminated water) पिणे टाळावे, तसेच लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी साठलेल्या डबक्यांमधून जाणे टाळावे.

हे वेळोवेळी सांगण्याची गरज असते. ग्रामीण भागात पाण्यापासून होणार्‍या आजारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ेमुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांंनी थेट सरपंचांंना जबाबदार धरण्याचे धोरण स्वीकारले आहे. ते चांगलेच झाले आहे. कारण गावाची सत्ता शेवटी सरपंचांच्या हाती असते. ते केवळ शोभचे पद नाही तर जबाबदारीचेही असते.परिणामी ग्रामसेवक व सरपंच या दोघांना कायम जागरुक राहावे लागेल. मुख्यालय सोडताना ग्रामसेवकांना विचार करावा लागेल.

सध्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करणे. तसेच अनेक ठिकाणी आपत्तीमुळे घरांचे नुकसान झाले. अशा ठिकाणी निवासीगृह तयार करुन नागरिकांची राहण्याची सोय करणे. तसेच कुणी उपाशी राहू नये, यासाठी जेवण पोहचविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच आवश्यक तिथे गावकर्‍यांची व विविध सामाजिक संस्थांची मदत घ्यावी लागणार आहे.

म्हणूनच येत्या काळात शासकीय यंत्रणेलासुध्दा चार्ज करावे लागते. कामचुुकार, मुख्यालयी न राहणारे यांना शोधून त्यांना कामाला लावावे लागेल. आरोग्य विभागाच्या दृष्टीने आगामी काळ कसोटीचा आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय या सर्वांच्या कामाची व कार्यक्षमतेची परीक्षाच हा काळ पाहणार आहे. पाहुया प्रशासन कसोटीस कसे उतरते?

- Advertisment -

ताज्या बातम्या