धुळे dhule। प्रतिनिधी
धुळ्यातील चितोड (Chitod village) गाव उड्डाणपुलाचे (flyover) बेकायदेशीर व चुकीचे बांधकाम (Illegal and wrongful construction) होत असल्याचा आरोप करुन धुळे-चितोड विकास कृती समिती (Dhule-Chitor Development Action Committee) व परिसरातील नागरिकांनी (citizens of the area) रास्तारोको आंदोलन (Rastraroko movement) केले. आंदोलनामुळे बायपासवर वाहतूकीची कोंडी झाली होती.
मौज चितोड गावावरुन चौपदरी रस्त्याचे काम सुरु आहे. याच गावालगत मोतीनाला दुथडा वाहत असतो त्यामुळे रस्ते विकास महामंडळातर्फे उड्डाणपुल उभारणीचे बांधकाम सुरु आहे. सदर उड्डाणपुलाचे तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही व चुकीच्या दिशेने बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. असा आरोप समितीने केला आहे.
नाल्यावरील उड्डाणपुलाचे बांधकामामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याने गावातील व परिसरातील नागरिकांचे प्रचंड प्रमाणात संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सदरच्या ठेकेदारास व अधिकार्यांना वेळोवेळी तोंडी व लेखी सुचना देवून सुध्दा कामात सुधारणा व बदल केलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
संबंधित ठेकेदाराने मोतीनाल्याचे नैसर्गिक पात्र दोनशे फुटांवरुन फक्त 20 फुट केले आहे. तीन वषार्ंपासून येथील नागरिक संघर्ष करीत आहेत. तरी देखील याची दखल घेतली जात नाही. या प्रकरणी दि.20 सप्टेंबर 2022 रोजी सामूहिक निवेदन देण्यात आले. त्यानंतर दि.28 सप्टेंबर 2022 रोजी चितोड गावातील व परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी समिती गठीत करुन लवकरात लवकर न्याय मिळेल असे आश्वासन दिले होते.
परिस्थितीमुळे चितोड गाव, महेश्वर नगर, खंडेराव सोसायटी, हटकर वाडी, येथील सुमारे 400 जणांच्या घरात पुराचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे. सदर प्रकार पुलाची निर्मिती झाल्यापासून दरवर्षी होत आहे. तक्रार किंवा मागणी कायम स्वरुपी निकाली व्हावी म्हणून प्रशासनाने प्रयत्न करावेत असे निवेदनात म्हटले आहे.
या रस्त्यावरुन चितोड, रावेर, दह्याणे, बह्याणे, अजनाळे, पाळद, डोंगराळे, जुन्नर, मोरशेवडी आदी गावातील नागरिक पायदळी, टू व्हीलर, फोर व्हीलरने प्रवास करतात. तसेच शाळकरी मुले-मुली देखील ये-जा करीत असतात. येथील उड्डाणपुलाचे भुयारी मार्ग यांची दिशा देखील पूर्णपणे चुकीची झाल्यामुळे रोज अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
त्यापासून अनेकांना जीवला मुकावे लागेल. म्हणून या उड्डाणपुलाचे रेखांकन (नकाशा) प्रत्यक्ष पाहून अवलोकन करावे. त्याबाबत देखील योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या प्रकरणी ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडावर रास्ता रोको आंदोलन चितोड चौफुली, सुरत बायपास जवळ येथे करण्यात आले.
या आंदोलनात समितीचे अध्यक्ष नंदकुमार बैसाणे, उपाध्यक्ष बापू बागुल, सचिव गौतम पगारे, कायदेशीर सल्लागार अॅड.संतोष जाधव आदिंसह नागरिक सहभागी झाले होेते. आंदोलनामुळे बायपासवर वाहतूकीची कोंडी झाली होती. तर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शर्मा यांना निवेदन दिले.