Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजचाेरट्यांची हिंमत वाढली; अप्पर पोलिस अधीक्षकांच्या घरात केली चोरी

चाेरट्यांची हिंमत वाढली; अप्पर पोलिस अधीक्षकांच्या घरात केली चोरी

चार लाखांचा ऐवज लंपास

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणूण कार्यरत अनिल पवार यांच्या नाशिक शहरातील घरी चोरट्याने घरफोडी करून ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पाथर्डी फाटा येथील हरीविश्व सोसायटी येथे २९ ते ३० जुलै दरम्यान घरफोडी झाली.

अनिल पवार यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडील माेलकरीण मावशीने दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटचे बाहेरील कुलूप जैसे थे होते, मात्र आतील कुलूप तोडलेले होते. तसेच सीसीटीव्ही व डीव्हीआरची तोडफोड केल्याचे आढळून आले. पवार यांनी पाहणी केली असता बाहेरील कुलूप त्यांनी लावलेले नव्हते. त्यामुळे कुलूप तोडून घरात पाहणी केल्यावर घरातील बेडरुममधील कपाटातून ३ लाख ३२ हजार रुपयांची रोकड, ४५ हजार रुपयांची दीड ताेळे वजनाची सोन्याची चेन, २२ हजार रुपयांचा टीव्ही, २ हजार रुपयांचा रेडिओ, चांदीच्या मूर्ती असा ऐवज चोरट्याने चोरला आहे.

याबाबत पवार यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरु केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...