Tuesday, May 28, 2024
Homeक्राईमNashik Crime News : महिलेला जाळण्याचा प्रयत्न; सराईत गुन्हेगारास पुण्यातून अटक

Nashik Crime News : महिलेला जाळण्याचा प्रयत्न; सराईत गुन्हेगारास पुण्यातून अटक

युनिट एकची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील भांडणातून महिलेसह (Woman) तिच्या मुलांना घरात कोंडून घराला बाहेरून आग लावत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे (Pune) येथून पकडले आहे. निखिल उर्फ स्वप्निल बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील पिंपळपट्टी परिसरातील रहिवासी कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी (दि.१९) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास जाळपोळ केली. तक्रार केल्याचा राग मनात ठेवून निखीलने कल्याणी यांना घरात कोंडून घराच्या खिडकी, दरवाजास आग लावली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कल्याणी यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) निखील विरोधात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर संशयित फरार होता. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक मिलीदंसिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित निखील पुणे येथील हिंजवडी येथे असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सूगन साबरे, हवालदार महेश साळुंके, नाईक परदेशी, अंमलदार राहुल पालखेडे, चालक समाधान पवार यांचे पथके पुणे येथे गेले. त्यांनी सापळा रचून निखीलला ताब्यात घेतले. त्याचा ताबा नाशिकरोड पोलिसांना (Police) देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या