Tuesday, April 29, 2025
Homeधुळेकॉलेजला जात असल्याचे सांगून निघालेल्या तरूणाचा आढळला मृतदेह

कॉलेजला जात असल्याचे सांगून निघालेल्या तरूणाचा आढळला मृतदेह

धुळे – प्रतिनिधी dhule

कॉलेजला (College) जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या तरूणाचा डेडरगाव तलावात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मोहम्मद रेहान इंद्रीस अन्सारी (वय 24 रा.मदीना पार्क रातराणी हॉटेज जवळ, धुळे) असे त्याचे नाव आहे. तो सकाळी 9 वाजता दुचाकीने कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाला. पंरतू सायंकाळी उशिरापर्यंत घरी आला नाही.

महाविद्यालयासह परिसरात शोध घेवूनही मिळून आला नाही. याबाबत चाळीसगाव रोड पोलिसात मिसिंगची तक्रार देखील देण्यात आली. मित्र, नातेवाईक शोध घेत डेडरगाव तलावापर्यंत गेले असता तलावात त्याचा मृतदेह मिळून आला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत मोहाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....