Wednesday, May 29, 2024
HomeनाशिकNashik Crime News : एकलहरे परिसरात आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

Nashik Crime News : एकलहरे परिसरात आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील एकलहरे रोड परिसरात (Eklahare Area) असलेल्या किर्लोस्कर कंपनी जवळील समोरच्या रस्त्यावर एका अज्ञात युवकाचा मृतदेह (Unknown Youth) आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर युवकावर धारदार हत्याराने वार करण्यात आले असून त्याची हत्या (Murder) करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच सदर युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून या प्रकरणामुळे पोलीस (Police) यंत्रणा हादरून गेली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monica Raut) सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

तसेच हत्या झालेल्या युवकाचे (Youth) वय साधारण ३० ते ३५ इतके असल्याचे समोर आले आहे. तर सदर युवक कुठला राहणार आहे? त्याचे नाव काय आहे? याबाबत पोलीस कसून शोध घेत आहे. त्याचप्रमाणे या युवकाला सदर भागात कुणी आणले होते का? किंवा तो स्वतःच आला होता का? याबाबतही पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या