Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

इंदिरानगर । वार्ताहर Indira Nagar

- Advertisement -

पाथर्डी गौळाणे रस्त्यावर एका दुचाकीला समोरून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गौळाणे येथील गोटीराम पांडुरंग तपासे (वय 40) यांचा या अपघातात जागीच मत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, सहा वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

पाथर्डी गौळाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. नव्याने विकसित होत असलेल्या या भागात हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत असून अजून किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून व त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

MPSC Exam : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' च्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २५...