Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालकाचा मृत्यू

- Advertisement -

पंचाळे | वार्ताहर Panchale

पंचाळे येथे आज(दि.७) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, पंचाळे डांबरनाला भागात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारंग गणेश थोरात (वय १०) या बालकावर अचानक हल्ला केला. घराजवळ खेळत असताना ही घटना घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या बालकास तत्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉटरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पंचाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी नाशिकचे वनक्षेत्रपाल हर्षल पालेकर व सहाय्यक संरक्षक कल्पना वाघेरे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, खडांगळी गावातील कडवा भागातसुद्धा दुपारी अशाच प्रकारची घटना घडली. शिव गणपत बोस (वय ६) हा मुलगा आपल्या आजीबरोबर फिरत असताना बिबट्याने त्याच्यावर मागून हल्ला केला. परंतु आजीने तात्काळ आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला आणि मुलगा बचावला. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.

वन विभागास पिंजर्‍याची मागणी
या दोन घटनांमुळे पंचाळे व परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वन विभागास तातडीने डांबरनाला भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. सध्या शेतकरी व ग्रामस्थांना स्वतःच्या जीविताची, मुलांच्या सुरक्षिततेची तसेच दुभत्या जनावरांच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने अधिक सतर्क राहून नागरिकांचे रक्षण करण्याची गरज असल्याचे माजी सरपंच विलास ठोक यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

भीमनवार

MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचं पेपरफुटीवर पहिल्यांदाच भाष्य, खुलं पत्र लिहित...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (Drug Inspector) पदभरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना आणि राजीनाम्याच्या...