Sunday, April 27, 2025
Homeमनोरंजनसिद्धार्थचा मृत्यू धक्कादायक, पण कारण अजून गुलदस्त्यात

सिद्धार्थचा मृत्यू धक्कादायक, पण कारण अजून गुलदस्त्यात

मुंबई | Mumbai

बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. टीव्ही व बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे….

- Advertisement -

सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांना निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आतापर्यंत मृत्यूच्या नेमक्या कारणाचा खुलासा केलेला नाही.

सिद्धार्थने काल रात्री झोपण्याआधी काहीतरी औषधे घेतली होती. पण सकाळी तो उठलाच नाही. अशातच अजून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिद्धार्थ काल रात्री घराबाहेर गेला होता. रात्री उशीरा तो आपल्या बीएमडब्ल्यू (BMW)कारने घरी पोहोचला.

Visual Story : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचा जीवनप्रवास तुम्हाला माहीत आहे का?

या कारची मागची काच फुटलेली असल्याचे आढळून आले आहे. कारची अवस्था पाहून सिद्धार्थचे कुणाशी भांडण किंवा वाद तर झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिद्धार्थच्या कारची काच कशामुळे फुटली याबाबत आतापर्यंत समजू शकले नाही. सिद्धार्थचा कुणाशी वाद झाला होता का? यामुळे तो अस्वस्थ होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारची शंका वा संशय व्यक्त केलेला नाही. डॉक्टरांनी सिद्धार्थला ‘डेथ बिफोर अराइव्हल’ (Dead Before Arrival) घोषित केले. अद्याप सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ...