Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या२ जूनला जिल्ह्यातील उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय मागे

२ जूनला जिल्ह्यातील उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय मागे

नाशिक | निशिकांत पाटील

निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी उद्या (दि. २जून) सर्व उद्योग बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला होता मात्र संशयतांवर कारवाई करण्यात यावी या संदर्भातले निर्देश उद्योग मंत्रांनी कडून प्राप्त झाल्यानंतर आजचा उद्योग बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती उद्योजकांच्या सुकानु समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गोपाळे यांनी पत्रकार परिषदे प्रसंगी दिली.

- Advertisement -

‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योग जगतावरील हल्ला असून तो निषेधार्थ आहे. परंतु उद्योजक , कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी उद्योजकांनी बंद मागे घ्यावा असे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाठविले. तसेच संशयितांवर कठोर कारवाई होणारच असे आश्वासन देखील सामंत यांनी पत्राद्वारे दिल्यानंतर या प्रश्नबाबत ७ किंवा ८ जुन रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत बैठक होणार असल्याने आजचा जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय मागे निर्णय घेण्यात आला.

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

यावेळी पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, वरूण तलवार ,डीजे जोशी, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ , योगेश पाटील, ज्ञानेश्वर गोपाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वप्रथम बेळे यांनी सर्व उद्योजक व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. उद्योग मंत्र्यांचे लेखी पत्र, भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरिश महाजन, दादा भुसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी फोनवर कंपनीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. परंतु उद्योग हितासाठी चांगले कार्य सुरू असताना तुम्ही एक पाऊल मागे या अशी विनंती सर्वांनी केली.

संशयितांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे बेळे यांनी उद्योग बंदचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती सुकानु समितीला केली. त्यानंतर सुकानु समिती तर्फे गोपाळे यांनी निर्णय जाहीर केला. बंदला सर्वच उद्योग संघटना, सिटू सह इतर कामगार संघटनेनेही पाठींबा दिल्याचे राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या