गंगापूर धरणातून लोखंडी पाईपलाइन टाकण्याचा निर्णय

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरण ते शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या (Gangapur Dam To Shivaji Nagar Water Filtration Plant Piple Line )सिमेंटच्या पाईपला वारंवार गळती होत असल्याने केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून 12.50 किलोमीटर लांबीची व अठराशे मिलिमीटर व्यासाची लोखंडी पाईपलाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीच्या 211 कोटी रुपये खर्चाची व योजनेच्या तांत्रिक प्रस्तावाची छाननी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.

यापूर्वी 1997 मध्ये जवळपास 12 किलोमीटर लांबीची व बाराशे मीटर व्यासाची सिमेंटची कच्चे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी टाकण्यात आली. वारंवार दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने सिमेंटऐवजी लोखंडी पाईपलाइन टाकण्याचा निर्णय घेतला.

गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान 400 दशलक्ष लिटर क्षमतेचे 12.50 किलोमीटर लांबीची 1800 मिलिमीटर व्यासाची नवीन लोखंडी पाईपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त होणार आहे.

जवळपास 211 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये 1.09 कोटी रुपयांचा खर्च प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार होणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव महासभेने मंजूर केला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक तपासणी केली जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *