Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : हिवाळी अधिवेशनात 'या' दिवशी होणार मराठा आरक्षणाबाबत चर्चा

Maratha Reservation : हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणाबाबत चर्चा

मुंबई | Mumbai

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणासाठी मराठा समाज ठिकठिकाणी साखळी उपोषण (Chain Hunger Strike) करत आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरा करत सभा घेऊन मराठा बांधवांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC) आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे यांनी केल्याने राज्यात मराठा आणि ओबीसी बांधव आमनेसामने आले आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने सभागृहात चर्चा करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती मंत्री उदय सामंतांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली…

- Advertisement -

Nashik Bus Fire News : धावत्या शिवशाही बसला भीषण आग

यावेळी बोलतांना सामंत म्हणाले की, “मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती चर्चा सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात होणार आहे. मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. मात्र, मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे, असे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी म्हटले.

शब्दगंध : काय सांगतात निकाल?

सामंत पुढे म्हणाले की, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इम्पॅरिकल डाटा गोळा करून आणि आयोगाला सांगून जमा झालेला इम्पॅरिकल डेटा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण आम्हीच देणार आहोत, असेही उदय सामंतांनी सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Chhagan Bhujbal : “तर लाठीचार्जनंतर…”; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

- Advertisment -

ताज्या बातम्या