Saturday, November 7, 2026
HomeनाशिकNashik News: स्वीकृत अकराव्या सदस्याचा वाद संपला; सुफी जीन यांचा अर्ज बाद,...

Nashik News: स्वीकृत अकराव्या सदस्याचा वाद संपला; सुफी जीन यांचा अर्ज बाद, दहा सदस्यांचे अर्ज वैध

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation)स्वीकृत सदस्यपदाच्या (Nominated Member) निवडीवरून निर्माण झालेला अकराव्या सदस्याचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. काँग्रेसचा स्वतंत्र गट नसल्याने काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी दाखल केलेला स्वीकृत सदस्यपदाचा अर्ज आयुक्त मनीषा खत्री यांनी फेटाळला आहे.

दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांकडून दाखल करण्यात आलेले दहाही अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. या दहा सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, आगामी महासभेत महापौर हिम गौरी आहेर-आडके यांच्याकडून त्यांच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

- Advertisement -


महापालीकेतील पक्षीय संख्याबळानुसार दहा स्वीकृत सदस्यांपैकी भाजपच्या वाट्याला सहा, शिंदेसेनेला दोन आणि विरोधी पक्षांच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. स्वीकृत सदस्यपदासाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. उबाठाकडून हेमंतकुमार गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांचे अर्ज यापूर्वीच दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी (दि. ४) शिंदेसेनेकडून बाबूराव आढाव आणि चंद्रकांत लवटे यांचे अर्ज सादर करण्यात आले.

जड अंतःकरणाने आणि असंख्य सुंदर आठवणींसह…; भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची कसोटीतून निवृत्ती

भाजपकडून प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, नामको बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रक, माजी नगरसेवक संदीप लेनकर, प्रदेशचिटणीस रोहिणी नायडू, तपोवन मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि रामहरी संभेराव यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक सुफ जीन यांनी टपालाद्वारे भाजपचे माजी नगरसेवक सुनील आडके यांचा अर्ज पाठविल्याने राजकीय बाद निर्माण झाला होता. उबाठाचे गटनेते केशव पोरजे यांनी या अर्जावर हरकत घेत न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता.

शुक्रवारी (दि. ६) आयुक्त मनीषा खत्री यांनी प्राप्त अर्जाची छाननी केली. काँग्रेसचा स्वतंत्र गट नसल्याने तसेच सुफी जीन हे गटनेते नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. उर्वरित दहा अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची नियमानुसार तपासणी करून वैध ठरविण्यात आले.

महासभेवर निवडीचा प्रस्ताव
दहा अर्ज वैध ठरल्यानंतर आयुक्तांनी स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या महासभेत या निवडीवर औपचारिक शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हे दहा अर्ज ठरले वैध
भाजप: अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव, संदीप लेनकर, शिंदेसेना: बाबूराव आढाव, चंद्रकांत लवटे,
उबाता हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

0
मुंबई | Mumbai राज्यात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना (Citizen) मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही स्थापन...