Saturday, May 4, 2024
Homeजळगावविभागीय आयुक्त करणार जळगाव मनपा गटनेते पदाचा फैसला

विभागीय आयुक्त करणार जळगाव मनपा गटनेते पदाचा फैसला

जळगाव : jalgaon

जळगाव महापालिकेत (municipal corporation) भाजपच्या २९ नगरसेवकांनी (29 corporators of BJP) आपला वेगळा गट (separate group) केला होता. या नगरसेवकांनी त्यांचा गटनेता (council leader) म्हणून ॲड. दिलीप पोकळे यांची निवड करुन ॲड. पोकळे हेच आमचे गटनेते असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मुळ भाजपचे गटनेते (BJP group leaders) भगत बालाणी यांनी न्यायालयात धाव (Run to court) घेतली होती. यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उच्च न्यायालयात कामकाज सुरु होते. शुक्रवारी या प्रकरणी उच्च न्यायालयाने (High Court) भाजप गटनेते पदाचा (BJP group leader post decision) निर्णय नाशिक विभागीय आयुक्तांनी (Nashik Divisional Commissioner) घ्यावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता गटनेते पदाचा फैसला विभागीय आयुक्तांच्या हाती असून त्यांना उच्च न्यायालयाने दहा आठवड्यांची मुदत दिली आहे.

- Advertisement -

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर अडीच वर्ष पुर्ण झाले व नवीन महापौर निवड होण्यापुर्वीच भाजपमध्ये फुट पडली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ५७ पैकी २९ नगरसेवकांनी फुटून वेगळा गट केला होता. त्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारला मतदान केल्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला होता. त्यानंतर २९ आम्ही भाजपचेच असून पक्षांत्तर केलेले नाही, असे म्हणत आमचे गटनेते ॲड. दिलीप पोकळे आहेत असा दावाही त्यांनी केला होता.

त्यावर भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगत बालाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, महापालिकेत भाजपचा गटनेता मीच आहे असा दावा दाखल केला होता. त्यावर फुटीर गटाचे गटनेते ॲड. दिलीप पोकळे यांनीही आपणच गटनेता असल्याचा दावा केला होता.

त्यावर शुक्रवारी मुबंई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणी दिलेल्या निर्णयात त्यांनी म्हटले आहे, कि गटनेत्याबाबतचा नाशिक विभागीय आयुक्तांनी घ्यावा.

नगरसेवक अपात्रतेप्रकरणी जी सुनावणी सुरू आहे. त्या सोबतच याचीही सुनावणी घेवून सहा आठवड्यात त्याबाबत निर्णय घ्यावा. या प्रकरणी याचिकाकर्ते भगत बालाणी यांच्यातर्फे शैलेश ब्रम्हे, दिलीप पोकळे यांच्यातर्फे ॲड.देवदत्त पालोदकर, महापालिका आयुक्तातर्फे ॲड.संदेश पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्यातर्फे ॲड.महेश देशमुख व नाशिक विभागीय आयुक्तांतर्फे ॲड.काळे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या