Saturday, July 27, 2024
Homeजळगावसेंट्रिंग कामगाराच्या खुनाला अनैतिक संबंधाची किनार

सेंट्रिंग कामगाराच्या खुनाला अनैतिक संबंधाची किनार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील उस्मानिया पार्कमधील सेंट्रिंग कामगार (Centering workers) शेख गफ्फार शेख जब्बार (Sheikh Gaffar Sheikh Jabbar) (वय-35) या तरुणाचा मृतदेह (Corpses) शुक्रवारी संशयास्पदरित्या ममुराबादरोडवर आढळून आला होता. शवविच्छेदन (Autopsy) अहवालातून त्या तरुणाचा खून झाल्याची उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी (police) आपली तपास चक्र फिरविली असता. या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी दोन संशयीतांना अटक करण्यात आली आहे. शहरातील ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्कमधील रहिवासी शेख गफ्फार शेख जब्बार हा तरुण सेंट्रिंग काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. बुधवारी सायंकाळपासून शेख गफ्फार बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबियांनी सोशल मिडीयावर त्याच्या हरविल्याची मॅसेज व्हायरल केला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवर शेख गफ्फारचा मृतदेह आढळून आला होता.

वाच्यता करण्यापूर्वीच काढला शेख गफ्फारचा काटा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेख शाबीर शेख सुपडू याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता, त्याने शेख गफ्फार याच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. याबाबत शेख गफ्फार याला माहित झाल्याने तो याबाबत सर्वांना सांगणार होता. त्याचा राग आल्याने शेख शाबीर याने त्याचा मत्र शेख फारुख उर्फ छोटू शेख शौकत वय-21 रा. श्रीरामपेठ जामनेर याच्या मदतीने शेख गफ्फार याचा काटा काढल्याची कबुली दिली.

शवविच्छेदनात प्रकार उघड

या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, प्राथमिक अहवालात त्याला गळफास दिल्याचे समोर आले होते. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शेख गफ्फार याचा मृतदेह संशयास्पदरित्या असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वेगवेगळे पथक तपासकामी रवाना झाले होते. यामध्ये एका पथकाला मयत शेख गफ्फार याच्या पत्नीचे संशयीत आरोपी शेख शाबीर शेख सुपडू वय-33 रा. श्रीरामपेठ ता. जामनेर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेख शाबीर शेख सुपडू याला ताब्यात घेत चौकशी केली.

गाडीतच गळा आवळून मृतदेह फेकला रस्त्याच्या कडेला

शेख शाबीरने त्याच्या भावाची कार आणून मयत शेख गफ्फार याला सुभाष चौकात बोलाविले. याठिकाणाहून त्याला गाडीत बसवून ममुराबाद रोडच्या दिशेने घेवून गेले. याठिकाणी जात असतांनाच शेख शाबीर व त्याच्या साथीदाराने गाडीतच शेख गफ्फारचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह रस्त्याच्याकडेला फेकून दिला. तसेच शेख गफ्फारचा मोबाईल घेवून ते जामनेरकडे निघून गेले.

एलसीबीची कामगिरी

तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल देवढे, अशोक महाजन, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, जितेंद्र पाटील, अश्रफ शेख निजामोद्दीन, अक्रम शेख याकुब, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, नितीन बाविस्कर, रणजीत जाधव, किशोर राठोड, राहूल पाटील, अविनाश देवरे, श्रीकृष्ण देशमुख, विजय पाटील, संतोष मायकल, विनोद पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार, भारत पाटील, अशोक पाटील, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने संशयीत आरोपी शेख शाबीर शेख सुपडू व त्याचा साथीदार शेख फारुख उर्फ छोटू शेख शौकात यांना अटक केली असून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या