नाशिक | प्रतिनिधी Nashik
‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात आज शहर परीसरांमध्ये श्रीदत्त जयंती ( Shri Datta Jayanti )महापूजा, गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली.
श्रीदत्त जयंतीनिमित्त गंगा गोदावरी तीरावरील पुरातन एकमुखी दत्तमंदिर( Ekmukhi Datta Mandir, Panchavati, Nashik ), गंगापूर रोड, नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड येथील दत्तमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचिन मंदिरात दत्तजयंती महोत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आज पहाटे दत्त मुर्तीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर विधीवत पुजन करुन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
नासर्डी पुलाशेजारील पौर्णिमा बसस्टॉपवरील मंदिरात प्रसादाचे वाटप झाले. दत्त मंदीर चौकात पूजा करण्यात आली. प्रसादाचे वाटप झाले.
सायंकाळी सहाला घरोघरी दत्त जंयंती निमीत्त पुजन करण्यात आले. पंचवटीतील संंत जनार्दन स्वामी नगर येथे श्री स्वामी समर्थ पारायणाची सांगता झाली. इंदीरा नगर येथील श्री. स्वामी समर्थ केंंद्रात दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारयणासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गुुरुचरीत्र पारायणास 154 साधक बसले. गुरवारी येथे सत्यदत् पुजन होणार आहे.
श्री समर्थ सद्गुरु ढगे महाराज ट्रस्टच्यावतीने ढगे महाराजांची 45 वी पुण्यतिथी व दत्त जयंती उत्सव गंगा घाट वरील ढगे महाराज मंदिरात संपन्न झाला.
या उत्सवानिमित्ताने नित्यसेवा पूजन ,हरिपाठ ,श्री सहस्रनाम रुद्राभिषेक, पुरुषसुक्त व श्रीसुक्त ,श्री समर्थ सद्गुरु ढगे महाराज यांची पालखी मिरवणूक, ढगे महाराज यांची महाआरती व गोपाळ काला प्रसाद ,श्री विठ्ठल रुक्माई मंदिर ,मुरलीधर लेन, कापड बाजार नाशिक येथे महाप्रसाद भंडारा , अनिल लोकरे इचलकरंजी यांचा मराठी भावगीत व भक्तिगीतांचा व महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम,श्री दत्त जन्म उत्सव व श्री समर्थ सद्गुरु ढगे महाराज यांची आरती व सायंकाळी श्री समर्थ सद्गुरु ढगे महाराजांच्या चरण पादुका पूजन, दर्शन, वंदन व प्रसाद वितरणाचा कार्यक्रम झाला .
ह्या प्रसंगी श्री समर्थ सद्गुरु ढगे महाराज ट्रस्टचे माधवराव फुले ,प्रतापराव पवार ,शरद धोंगडे, अनंता ढगे, उत्तमराव तांबे, बापूसाहेब वाळुंजे , श्रीकांत ढगे, संजय ढगे, रमेश कडलग, बाळकृष्ण पवार, दत्तात्रय तिडके, राजाभाऊ डोंगरे, राजाराम दुकळे , बाळासाहेब शेंडे , शंकरराव मंडलिक व भक्तगण उपस्थित होते.