Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्यावसूलीसाठी अधिकार्‍यांची दमछाक; थकबाकीदारांना अंतिम नोटिसा

वसूलीसाठी अधिकार्‍यांची दमछाक; थकबाकीदारांना अंतिम नोटिसा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेचे (Nashik Municipal Corporation) पाणीपट्टी (water tax) वसुलीचे 75 कोटींच्या उद्दिष्टापैकी केवळ 35 कोटींची वसुली (recovery) झाल्याने मनपा प्रशासनाकडून पाणीपट्टी वसुलीचीसाठी कठोर पावले उचलली जात आहेत.

उद्दिष्टाच्या तुलनेत निम्मीच वसुली झाल्याने, अधिकार्‍यांनी आता निवासीसोबतच व्यावसायिक नळकनेक्शन (Faucet connection) ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रत्यक्षात उद्दीष्ट पूर्तीसाठी अधिकार्‍यांची मात्र पूरती दमछाक होताना दिसून येत आहे. दरम्यान, प्रशासनाने एक जानेवारी पासून विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर महापालिकेने आतापर्यंत 747 थकबाकीदारांना अंतिम नोटिसा (notice) बजाविल्यानंतर त्यातील 590 नळ कनेक्शनधारकांकडून 97 लाखांची थकबाकी वसूल (Recovery of arrears) केली आहे.

मागिल 12 दिवसांतच तब्बल 157 नळकनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने सातपूर (satpur) आणि नविन नाशिकातील (navin nashik) ग्राहकांची संख्या मोठी आहे. मनपा आयुक्त व प्रशासक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने पाणीपट्टीच्या (water tax) 12 हजार 500 व्यावसायिक थकबाकीदारांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

ग्राहकाना नोटीस देऊनही थकबाकी भरत नसल्यामुळे थकबाकीदारांचे नळकनेक्शन कापण्यात आले आहेत.नळकनेक्शन बंद करण्यात कष्टकरी व कामगारांची वसाहत असलेल्या सातपूर व नविन नाशिक विभागातील ग्राहकांची संख्या मोठी आहे.

  • पहिल्या टप्प्यातील उद्दीष्ट – सहा कोटीं

  • नळ कनेक्शनधारकांना नोटिसा – 747

  • थकबाकीदाराकडून 97 लाखांची वसूली -590

  • थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित -157

खंडित केलेले नळकनेक्शन

  • नाशिक पूर्व -16

  • पंचवटी -10

  • ननि नाशिक -52

  • सातपूर -66

  • नाशिकरोड -13

- Advertisment -

ताज्या बातम्या