थाळनेर Thalner । वार्ताहर
मनुष्य जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhary) यांच्या काव्यातून येणारा अनुभव (experience of poetry) हा उपयुक्त असून त्यातूनच मनुष्य जीवनाला खरा आकार प्राप्त करून घेता येतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी.जे.गावीत यांनी केले.
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील कै. अण्णासाहेब पितांबर शंकर वाडिले कला महाविद्यालयात (Thalner College) कवयित्री बहिणाबाई चौधरी (Birth anniversary of Bahinabai Chaudhary) यांची जयंती साजरी करण्यात येवून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्राचार्य गावीत हे बोलत होते.
अन्नपुर्णादेवी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र वाडीले यांच्या हस्ते व सचिव डॉ. निळकंठ वाडीले यांच्या उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. जे. गावित हे होते. मराठी विभाग प्रमुख प्रा.विजय झुंजारराव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. एस. एम. बोरसे यांनी केले.
आभार राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एम. डी. रणदिवे यांनी मानले, कार्यक्रमाला प्रा. व्ही. डी. झुंजारराव, डॉ. टी. आर. शर्मा, प्रा. एस. एस. राठोड, प्रा. आर. के. सोनवणे, डॉ. आर. बी. अहिरे, ग्रंथपाल हितेंद्र माळी, नवनीत वाडीले आदी उपस्थित होते.