Monday, March 31, 2025
Homeनंदुरबारपिस्टलचा धाक दाखवून दोघं शेतकऱ्यांना १४ लाख लुटले

पिस्टलचा धाक दाखवून दोघं शेतकऱ्यांना १४ लाख लुटले

नंदुरबार | प्रतिनिधी -NANDURBAR

तालुक्यातील भालेर येथील दोन शेतकरी कापुस विक्रीचे पैसे घेवून गावाकडे जात असतांना कारमधुन आलेल्या चौघांनी डोळ्यात मिरचीची पुड टाकुन पिस्टलचा धाक दाखवून मारहाण करीत १३ लाख ९४ हजार रूपये रोख लुटल्याची धक्कादायक घटना काल रात्री दिड वाजेच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

याबाबात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकरी सुनिल गंगाराम पाटील व हंसराज दगाजी पाटील हे कापुस विक्रीचे पैसे घेवून भालेर गावाकडे मोटारसायकलने रात्री १.३० वातच्या सुमारास जात असतांना नंदुरबार-उमर्दे खुर्दे रस्त्यावरील होळ गावाकडे जाणार्‍या फाट्याजवळ अज्ञात आरोपी यांनी त्यांच्या ताब्यातील पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार सुनिल पाटील व हंसराज पाटील यांच्या मोटारसायकलच्या दिशेने घातली.

त्यानंतर गाडी मधील ४ अनोळखी इसमांनी शेतकर्‍यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकुन त्यांनी सुनिल पाटील व हंसराज पाटील कापुस यांना पिस्टल चा धाक दाखवून तसेच त्यांच्याशी झटापटी करुन जबरजस्तीने दोन पैशांच्या पिशव्या त्यात ५०० रुपये व १०० रुपये दराच्या चलनी नोटा असा एकुण १३ लाख ९४ हजार रुपये रोख रक्कम झटापटी करुन जबरजस्तीने हिसकावून घेवून स्विफ्ट डिझायर गाडीने तेथुन नंदुरबारच्या दिशेने पळुन गेले.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुनिल गंगाराम पाटील रा. भालेर ता. जि. नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द भा. द. वि. का. कलम ३९४, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ चे उल्लंधन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

देवगाव शिवारात अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa नेवासा पोलिसांनी (Newasa Police) देवगाव शिवारामध्ये एका डंपरमधून होत असलेल्या अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....