Wednesday, March 26, 2025
HomeमनोरंजनBIGG BOSS Marathi : 'या' तारखेपासून सुरु होणार 'बिग बॉस मराठी'चा पाचवा...

BIGG BOSS Marathi : ‘या’ तारखेपासून सुरु होणार ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’ (Big Boss Marathi) या सीझन ५ ची आतुरतेने वाट बघत होते. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या पाचव्या सिझनची तारीख समोर आली असून नुकताच त्याचा चौथा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी ‘बिग बॉस मराठी’चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी या शोच्या चार पर्वाच्या सू्त्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. यानंतर आता हटके अंदाजात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : IND VS PAK : आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान विजेतेपदासाठी भिडणार

‘बिग बॉस मराठी’ सिझन ५ चा ग्रॅन्ड प्रीमियर २८ जूलै २०२४ रोजी पार पडणार आहे. तर मुख्य हंगामाला २९ जूलैपासून सुरुवात होणार आहे. हा रिॲलिटी शो सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे. बिग बॉसच्या पाचव्या हंगामाच्या प्रोमोमध्ये अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) एका वेगळ्या रांगड्या अंदाजात दिसत असून यामध्ये एक नवीन ऊर्जा आणि वेगळा जोश पाहायला मिळत आहे.तसेच यंदाच्या हंगामात या शोमध्ये बिग बॉसच्या घरात (Home) प्रवेश करणाऱ्या सर्व स्पर्धकांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : १३ जुलै २०२४ – भूतां परस्परे जडो…

दरम्यान, नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने म्हटले आहे की, ‘मी येणार म्हणजे कल्ला तर होणारच’ असे म्हणत शोची तारीख जाहीर केली. त्यामुळे आता प्रेक्षकांना यंदाच्या हंगामात कोणते नवीन स्पर्धक सहभागी होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर बिग बॉसच्या घरातील मज्जा, मस्ती, डाव प्रतिडाव, अशा सर्व गोष्टी पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना या शोमध्ये बघायला मिळणार आहे

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुरगाणा गटविकास अधिकारी २ लाख १० हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात

0
सुरगाणा| प्रतिनिधीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत दोन कोटी 32 लाख 30 हजार रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात दोन लाख दहा हजारांची लाच...