जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik
इस्लामी शाबान महिन्याची आज 29 तारीख होती, त्यामुळे पवित्र रमजान महिन्याच्या चंद्र दर्शनाची शक्यता होती. मात्र शहरासह जवळपास कुठेही पवित्र रमजान महिन्याचे चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे शाही मशिदीत उलेमांची चांद समितीची बैठक होऊन चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून रविवारी (दि.2) पहिला रोजा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती रजा खतीब यांनी दिली.
- Advertisement -
दरम्यान मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्याची तयारी पूर्ण केली आहे. उद्या शनीवारी सायंकाळी रमजानची विशेष तरावीची नमाज देखील पठण करण्यात येणार आहे तर पहाटे रोजा ठेवण्यात येणार आहे. आज सायंकाळी पवित्र रमजान महिन्याचे चंद्र पाहण्यासाठी मुस्लिम बहुल भागात मुस्लिम बांधवांसह महिलांनी तसेच लहान मुलांनी उंचीच्या ठिकाणी गर्दी केली होती, मात्र चंद्रदर्शन घडले नाही.