Tuesday, June 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपवित्र रमजानचा पहिला रोजा रविवारी; चंद्रदर्शन न झाल्यामुळे निर्णय

पवित्र रमजानचा पहिला रोजा रविवारी; चंद्रदर्शन न झाल्यामुळे निर्णय

जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik

इस्लामी शाबान महिन्याची आज 29 तारीख होती, त्यामुळे पवित्र रमजान महिन्याच्या चंद्र दर्शनाची शक्यता होती. मात्र शहरासह जवळपास कुठेही पवित्र रमजान महिन्याचे चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे शाही मशिदीत उलेमांची चांद समितीची बैठक होऊन चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून रविवारी (दि.2) पहिला रोजा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती रजा खतीब यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्याची तयारी पूर्ण केली आहे. उद्या शनीवारी सायंकाळी रमजानची विशेष तरावीची नमाज देखील पठण करण्यात येणार आहे तर पहाटे रोजा ठेवण्यात येणार आहे. आज सायंकाळी पवित्र रमजान महिन्याचे चंद्र पाहण्यासाठी मुस्लिम बहुल भागात मुस्लिम बांधवांसह महिलांनी तसेच लहान मुलांनी उंचीच्या ठिकाणी गर्दी केली होती, मात्र चंद्रदर्शन घडले नाही.

ताज्या बातम्या

Shrirampur : गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB Police) मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील हरेगाव (Haregaon) रोडवरील एस कॉर्नर...