Wednesday, September 11, 2024
Homeभविष्यवेधराजघराण्याचे वारस फारुख अब्दुल्ला

राजघराण्याचे वारस फारुख अब्दुल्ला

फारुख अब्दुल्ला यांचा जन्म काश्मीर प्रदेशातील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात झाला. काश्मीरचे सिंह म्हणून ओळखले जाणारे त्यांचे वडील शेख मुहम्मद अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सची (Jammu Kashmir National Conference) स्थापना केली. जम्मू आणि काश्मीरच्या अर्धस्वायत्त राज्य म्हणून निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. फारुख अब्दुल्ला यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1937 रोजी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला आणि बेगम अकबर जहाँ अब्दुल्ला यांच्या पोटी झाला. यांनी टिंडेल बिस्को स्कूलमध्ये शिक्षण घेतले.त्यानंतर एसएमएस मेडिकल कॉलेज, जयपूर येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यांनी प्रारंभी वैद्यकीय व्यवसाय ब्रिटनमध्ये केला.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

फारुख अब्दुल्ला यांनी ब्रिटीश वंशाच्या मॉली यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगा ओमर आणि तीन मुली साफिया, हिना आणि सारा आहेत. त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला राष्ट्रीय राजकारणात आहेत. ते लोकसभेचे सदस्य आहेत. ते जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांची मुलगी साराने काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याशी लग्न केले आहे. ऑगस्ट 1981 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरच्या राजकीय क्षेत्रात नवशीके राजकारणी होते. शेख अब्दुल्ला यांचे पुत्र असल्याने त्यांचा राजकीय प्रवेश सहज होता.

- Advertisement -

1982 मध्ये वडिलांच्या निधनानंतर फारुख अब्दुल्ला राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1984 मध्ये त्यांचे मेहुणे गुलाम मोहम्मद शाह यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सचा एक गट फुटला. ज्यामुळे त्यांचे सरकार कोसळले आणि त्यांची बरखास्ती झाली. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने शाह मुख्यमंत्री झाले. 1987 मध्ये निवडणूक झाली आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने निवडणूक जिंकली. या काळात जम्मू आणि काश्मीरमध्येे प्रशिक्षित अतिरेकी परत आल्याने आणि गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीच्या अपहरणाच्या घटनांसह राज्यात दहशतवादात वाढ झाली. त्यानंतर, जगमोहन यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी निषेधार्थ राजीनामा दिला. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये निघून गेले.

भारतात परतल्यानंतर 1996 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे सरकार संपूर्ण सहा वर्षांचा कार्यकाळ टिकले. 1999 मध्ये नॅशनल कॉन्फरन्स अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाली आणि त्यानंतर त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राजघराण्यात जन्म झाला असेल तर हातावर ऐश्वर्य, हुकूमत, सत्ता दिसून येते का? किंवा हातावरील ग्रह, रेषा, चिन्हे या ऐश्वर्यसंपन्न असतात का? हातावरील ग्रह रेषा या स्वयं ब्रह्माची निर्मिती आहे व जेंव्हा ब्रह्म हाच विधाता आहे व त्याच्या निर्मितीत जन्म होतो, त्यावेळेस गोर गरीबाच्या घरी जन्म, साधारण परिस्थिती असलेल्या व श्रीमंतीत, राजघराण्यात अथवा ऐश्वर्य संपन्न घरात जन्म झालेल्या व्यक्तींच्या हातावर त्यांच्या असलेल्या परिस्थितीनुसार हस्तरेषा व ग्रहांचे बलाबल असते. आजपर्यंत मी चित्रपट जगत, राजकारण, धर्म गुरु, निरनिराळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष्य, राष्ट्रपती, धनवान उद्योगपती, क्रिकेट खेळाडू इत्यादी अनेकांच्या हस्तरेषांचे विश्लेषण केले.

अनेक नामवंत व्यक्तींच्या हातावरील ग्रह रेषानुसार त्यांचे भविष्य लिहिले. त्यांच्याही आयुष्यात यश अपशय आहे. परंतु ते धनवान आहेत. आजकाल सामाजिक प्रतिष्ठा धनवांनाकडे आहे. पैशानेच प्रतिष्ठा मोजण्याचे दिवस असल्याने असे घडते. यात त्यांचे धन वैध का अवैध मार्गाने येते, याची दखल किंवा पर्वा समाज करीत नाही. अभिताभ बच्चन यांच्यासारख्या शून्यापासून ते ऐश्वर्यसंपन्न नामवंत व्यक्तींच्या हातांच्या रेषांचे विश्लेषण करताना त्यांच्या हातावरील शुभ ग्रह रेषांची निर्मिती तपासली की, त्यांच्या आयुष्यातील यश व ऐश्वर्य यांची कल्पना येते. व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रात यश लाभले कि त्याच्या मागोमाग लक्ष्मी येते. ती त्यांचे जीवन संपन्न करते.

आजपर्यंतच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यतींच्या हातावरील रेषा, ग्रह, चिन्ह यांचे कारकत्व तपासताना विधात्याने दिलेल्या संपन्नतेचा हातावरील अचूक रेषा रुपी नकाशा अभ्यासला गेला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हातावरील हस्तसामुद्रिक विश्लेषण करताना प्रत्येकाच्या आयुष्यातील सुख दुःखाची झलक पाहावयास तर मिळाली. त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत तंतोतंत उतरल्याचे दिसून आले. हि हस्तरेखाशास्त्राच्या अचूकतेची पावती वाटते. पूर्वजन्मीच्या संचितानुसार मनुष्याचा जन्म होतो. त्याचे संचित डाव्या हातावर व उजव्या हातावर आयुष्याच्या कर्म व भाग्याचा लेखाजोखा मुद्रित असतो. हा मुद्रित असलेला भाग्याचा लेखाजोखा हस्तसामुद्रिक नियमांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासला जातो.

फारूक अब्दुल्ला यांचा उत्तम उजव्या हाताचा फोटो उपलब्ध झाल्याने त्यांच्या आयुष्यातील सुख दुःख व मिळालेल्या भाग्याचा आलेख अभ्यासताना राजसंपन्न जीवनाची प्रचिती येते. त्यांच्या तळहाताच्या छायाचित्रात सर्वात प्रथम लक्ष जाते ते मजबूत हाताच्या पंज्याकडे. हस्तसामुद्रिकशास्त्रात हाताचा पंजा, अंगठा व बोटे यांचे कारकत्व मोठे आहे. मजबूत हात हा निश्चयी, अधिपत्य व नेतृत्व करणार्‍या व्यक्तींचा असतो.

हाताच्या पंजाच्या ठेवणीची निर्मिती त्या व्यक्तीच्या विद्वत्तेनुसार, भाग्यानुसार व एकंदरीतच त्याच्या आयुष्यातील नशिबानुसार असते. फारुख अब्दुल्ला यांचा अंगठा मजबूत आहे. त्यामुळे निर्णय क्षमता आहे. रवीचे बोट शनीच्या बोटाच्या उंचीच्या बरोबर असल्याने रवी ग्रहाची खूप मोठी साथ आहे. जन्मच संपन्न राजघराण्यात असल्याने व घरची भाकरीची चिंता नसल्याने राजकारणात वारसा हक्काने आल्याने, गादीवर बसण्यासाठी विशेष कष्ट अथवा सामाजिक कार्य करण्याची गरज फारुख अब्दुल्ला यांना लागली नाही, वडिलानंतर ते मुख्यमंत्री झाले.

फारुख अब्दुल्ला यांच्या तळहाताच्या मध्यावर एक अंगठ्यापासून करंगळीच्या खाली हृदयरेषेपर्यंत एक आडवी ठळक रेषा असल्याने ते राष्ट्रीय राजकारणात येऊ शकले नाहीत. त्यांचा चमको काश्मीर पुरताच मर्यादित राहिला. त्यांचा पक्ष 370 कलम लागण्याच्या आधीसुद्धा सत्तेवर नव्हता. हृदय रेषेवर रवी ग्रहाखाली व शनी ग्रहाखाली सुद्धा हृदय रेषा अस्तव्यस्त झाली आहे. पसरट होऊन खोलगट भाग तयार झाला आहे. हि हृदय विकाराची किंवा आघाताची स्थिती आहे. परंतु फारुख अब्दुल्ला हे आज 87 वर्षांचे आहेत व हा हृदय रेषेवरील गंडांतर योगाचा आघात हा वय वर्ष 72 च्या दरम्यान आहे.

फारुख अब्दुल्ला यांचा हृदयविकाराचा योग आता टळला असला तरी, हृदय रेषेवरील गंडांतराची खूण आहे ती कदाचित तळ हाताला गंभीर इजा झाल्यामुळे झाली असणार आहे. कारण हृदय रेषा शनी ग्रहाखाली सुद्धा बिघडली आहे. नाहीतर हा गंडांतर योग न टाळणारा होता. हृदय रेषेतून शनी ग्रहाच्या खाली एक रेषेचा फाटा आहे व तो थेट आयुष्य रेषेला छेद देऊन वरच्या मंगळ ग्रहावर अंगठ्यापर्यंत गेला आहे. हृदय रेषेच्या एखाद्या उपरेषेने आयुष्य छेद देऊन ती जर खालच्या मंगळ ग्रहावर जाऊन पोहोचली तर अशा वेळेस त्या व्याक्तीच्या आयुष्यात त्यांच्या जवळचे जीवा भावाचे लोक निश्चित धोका देतात. फारुख अब्दुल्ला यांच्या मेव्हण्याने दुसरा पक्ष स्थापन करून अब्दुल्ला यांचे सरकार पाडले व आजही ते त्यांचे कायमचे विरोधक आहेत.

फारुख अब्दुल्ला यांच्या तळहातावरची मस्तक रेषा व आयुष्य रेषा उगमस्थानी वय वर्ष तीसपर्यंत एकत्र आहे. त्यामुळे ते त्यांच्या धर्माचे आचरणाबरोबरच त्यांच्यावर झालेल्या संस्काराशी कट्टर आहेत. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरल्याने फारुख अब्दुल्ला यांची कल्पनाशक्ती मोठी आहे. ते डॉक्टर असल्याने त्यांची शारीरिक व्याधींची चिकित्सा व उपचार अचूक आहेत. त्यांच्या उपचाराने

आजार्‍याला निश्चितच गुण आलेले असणार आहेत. शुक्र ग्रहापेक्षा चंद्र ग्रह मनगटाकडे अधिक सरकल्याने व तेथे चंद्र ग्रहाला उभार असल्याने त्यांचेकडे विद्वत्ता आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या बोटाखालील ग्रहांचा उभार हा त्यांच्या वयामुळे बसका झाला आहे. चंद्र व शुक्र ग्रहाचा उभार हा सहसा वयस्क व्यक्ती झाली तरी बसका होत नाही. वय झाल्याने बोटाखालील ग्रह बसके झाल्याने त्या ग्रहांचे कारकत्व त्या व्यक्तीच्या जन्म समयी जे होते तेच राहते. त्यात बदल होत नाही. हस्त सामुद्रिक शास्त्रानुसार ग्रहांचा उभार मोठा असता ते बलवान व श्रेष्ठ समजले जातात. परंतु हे फक्त वयाच्या पन्नाशीपर्यंत उभार ग्रहाचे मापदंड मोजावे लागतात. कारण वय झाल्यानंतर तळहातातील स्नायूंची ताकद कमी झाल्याने त्यांच्यातील ताठरपणा कमी होत जातो.

फारुख अब्दुल्ला यांच्या हातावर भाग्य रेषेचा उगम आयुष्य रेषेतून मनगटाचे जवळ होत असल्याने ते जन्मतःच भाग्य घेऊन आले आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक विवंचना कधीही नव्हती व नाही. त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. तसेच रवी रेषा भाग्य रेषेतून उगम पावत असून फारुख अब्दुल्ला यांची कीर्ती प्रसिद्धी, मा सन्मान जस जसा वाढत गेला त्याप्रमाणे लक्ष्मीचा ओघ वाढता राहिला. फारुख अब्दुल्ला यांची आयुष्य रेषा वय वर्ष 92 पर्यंत खणखणीत असल्याने त्यांना आयुष्मान योग आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या