Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधनिर्दोष आयुष्य रेषा व मंगळ रेषा दोनही हातावर असल्यास करोनाची भीती...

निर्दोष आयुष्य रेषा व मंगळ रेषा दोनही हातावर असल्यास करोनाची भीती नाही !

आयुष्य रेषा- आयुष्यरेषा गुरु उंचवट्यावरुन खालच्या मंगळ-शुक्र उंचवटा, यांना वळसा घालून मणिबंधापर्यंत जाऊन समाप्त होते. आयुष्यरेषा त्या व्यक्तिच्या जीवनातील विविध कालखंडातील आरोग्य दाखविते. आयुष्यातील अनेक तपशीलवार घटनांची नोंद या रेषेवर होते. व्यक्तिच्या उत्कर्षाचा कालखंड आयुष्याचा शेवट किंवा जीवन समाप्ती, आजारात होईल किंवा कसे हे दाखविते. आयुष्य रेषा ही व्यक्तिच्या नैसर्गिक जीवनाचा आलेख आहे, या रेषेवरून त्या व्यक्तीचे शारीरिक सामर्थ्य, आरोग्याची स्थिती याची माहिती मिळते.

हातावर आयुष्य रेषा अजिबात नसणार्‍या व्यक्ती मला तरी आजपर्यंत आढळल्या नाहीत. आयुष्य रेषेची लांबी छोटी मोठी असू शकेल, क्षीण, दूर्बल असू शकेल, पण तिची अनुपस्थिती दिसत नाही. क्षीण, दूर्बल, छोटी आयुष्य रेषा असलेल्या व्यक्तीच्या अंगी शारीरिक ताकद आणि उत्साह यांची कमतरता दिसून येते. त्यांची प्रकृति कधिही धडधाकट असत नाहीत, कायम नाजूकच राहते. दोनही हातावरील आयुष्य रेषा क्षीण, दूर्बल, छोटी असता, नैसर्गिक आयुष्य तिच्या समाप्तीच्या पुढे चालू रहात नाही.

- Advertisement -

आयुष्य रेषेची तपासणी करतात दोनही हातावरील रेषा व तिची स्थिती यांचा विचार करावा लागतो. उजव्या हातावर आयुष्य रेषा दोषपूर्ण, खराब झाली असेल व डाव्या हातावरची रेषा उत्तम असेल, तर त्या व्यक्तिची जन्मजात प्रकृती उत्तम असते, परंतु व्यक्ती जशी मोठी होत जाते, यशाची शिखरे गाठते, तशी तिच्या उजव्या हातावरील आयुष्यरेषा खराब आरोग्य दाखविते व त्या आरोग्याची हेळसांड त्या व्यक्तीच्या स्वत:च्या हाताने झालेली असते. त्याला ती व्यक्ती, तिला लाभलेले वातावरण, व्यसने, संकटे, आजार इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत होतात.

लांब व उत्तम आयुष्य रेषा असणार्‍या व्यक्तीचे आरोग्य व जोम चांगला असतो. रेषा, बारीक खोल व गुलाबी रंगावर, मोठया लांबीची, सुस्पष्ट, असेल तर व्यक्ति सुदृढ, उत्साही व जोमदार असते, रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता तीच्यामध्ये मोठी असते, नाजूकपणा, दूबळेपणा त्या व्यक्तीत नसतो, श्रम करण्याची कुवत असते. हातावरील रेषा रुंद, उथळ, साखळीयुक्त असेल तर अशा व्यक्तीमध्ये जोम व उत्साहाचा अभाव दिसून येतो, शारीरिक कमकूवतपणा असतो, आत्मविश्वास रहात नाही. मात्र हातावर आयुष्य रेषा खोल असेल तर भरपूर उत्साह, उर्जा, आत्मविश्वास, दणकट प्रकृती, उत्तम आरोग्याचा लाभ अशा व्यक्तींना झालेला असतो. तसेच त्यांची रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती जास्त असते. क्षीण आयुष्य रेषा असणार्‍या व्यक्तीची प्रकृ ती कधीच धडधाकट असू शकत नाही.

मंगळ रेषा – मंगळ रेषा ही आयुष्य रेषेतून किंवा मंगळ उंचवट्यावरून उगम पावून आयुष्य रेषेबरोबर मार्गक्रमण करत असते तर या रेषेचे काम आरोग्य टिकवणे व बलशाली करणे असते. आयुष्य रेषेच्या आत मंगळ रेषा दृढ व उत्तम असेल तर अशा व्यक्तीत उत्साह, जोम, प्रतिकार शक्ती आढळते.

हातावरील आयुष्य रेषेत काही दोष असतील व त्याचवेळी उच्चप्रतीची मंगळ रेषा असेल तर आयुष्य रेषेतील दोष नाहीसे होतात.

मंगळ रेषा खालच्या मंगळ उंचवटयावर उगम पाऊन आयुष्य रेषेच्या आतून तिच्या जवळून जाते. मंगळ रेषा ही आयुष्य रेषेची सहयोगी रेषा आहे, ती केवळ आयुष्य रेषेशीस संबंधित असते, शुक्र उंचवटयावर असली तरी ती शुक्र उंचवटयावरील प्रभावरेषा नव्हे, ती आयुष्य रेषेच्या सामर्थ्यामध्ये भर घालते. मंगळ रेषा असल्यास, ती व्यक्ति अधिक उत्साही व प्रबळ शक्तीची असते. मंगळ रेषा ही मुख्यत: आयुष्य रेषेवरील वाईट प्रभावाला संरक्षण देते, आयुष्य रेषा, क्षीण, उथळ, साखळीयुक्त, रुंद, वा अन्य वाईट लक्षणाची असेल तर तिचे रक्षण मंगळ रेषा करते.

मंगळ रेषा उत्तम व आयुष्य रेषाही सुदृढ असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या अंगी, काम करण्याची जोमदार ताकद उपलब्ध असते. व्यक्तीच्या हातावर मंगळ रेषा असेल तर, जोम, उत्साह, सहनशक्ती व आक्रमकता असते, अश्या व्यक्ति अति उत्साही असल्यामुळे त्यांचे हातून अतिरेकीकृत्य होण्याचा संभव असतो. मंगळ रेषा असलेले लोक लढवैय्ये असतात, गुरु प्रकारातील व्यक्तीच्या हातावर मंगळ रेषा असलेले लोक इतर कुठल्याही लोकांपेक्षा अधिक ताण सहन करु शकतात.

मंगळ रेषा अस्तित्वात असताना अशा लोकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे काम द्यायला हवे, नाहीतर हे आपली अतिरिक्त शक्ती वाईट कामामध्ये वाया घालवितात. मंगळ रेषा पूर्ण लांबीची असेल तर आयुष्यभर त्या व्यक्तिचा जोम व उत्साह टिकून असतो, त्यामुळे मंगळ रेषेचे मापन आयुष्य रेषेवरील वयानुसार करुन तीची लांबी छोटी मोठी किती आहे, ती चांगली वाईट कधी झालेली आहे, थोडक्यात कोणत्या वयाला उत्तम आहे, खराब आहे, अथवा अदृष्य झाली आहे का हे पाहणे गरजेचे आहे.

फोटोतील आयुष्य रेषा नाजक आहे,विस्कळीत झाली आहे, अश्या परिस्थितीत प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव यांच्यावर लगेचच होतो असे लोक रोगाला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. अशी विस्कळीत आयुष्य रेषा हातावर असेल तर अश्या लोकांनी कोरोना काळात अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.

वरील फोटोतील आयुष्य रेषा वय वर्ष 10 ते 15 व 26 ते 38 या वर्षात आयुष्य रेषा दुभंगली आहे व तेथे यवासारखे चिन्ह झाले आहे या वय वर्षात या व्यक्तीची प्रकृती नाजूक राहणार आहे, प्रतिकार शक्ती कमी राहील त्यामुळेे यांनी सध्याच्या रोगाच्या संकटात काळजी घेतली पाहिजे.

वरील आकृतीत संपूर्ण आयुष्याचे कालमापन आयुष्य रेषेवर दाखविले आहे, आयुष्य रेषा हातावर कमी अधिक लांबीची मणी बंधापर्यंत न जाणारी असली तरी, आयुष्य रेषेच्या उगम स्थानी अंगठ्याचे वर सुरवातीला शून्य पकडून मोजायचे आहे, तिच्या अर्ध्या लांबीला 50 वर्ष व मणिबंधापर्यंत 100 वर्ष आयुर्मान गृहीत धरायचे आहे. 50चे वर अर्ध्या भागात 25 येईल व वय वर्ष 50 ते शंभर च्या दरम्यान वरच्या आयुष्य रेषेच्या लांबीचा अंदाज काढून आयुष्य रेषा 60,70,80,90 गृहीत धरून व तिचा कालनिर्णय सहज काढता येतो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या