Sunday, March 30, 2025
HomeनाशिकNashik News : दिवसाढवळ्या बालिकेचे अपहरण; काही तासांतच अपहरणकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला सोडून...

Nashik News : दिवसाढवळ्या बालिकेचे अपहरण; काही तासांतच अपहरणकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला सोडून देत काढला पळ

सिन्नर | प्रतिनिधी | Sinner

तालुक्यातील देवपूर (Devpur) येथून आज मंगळवार (दि. १९) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सानवी अविनाश वाणी या तीन वर्षांच्या बालिकेचे (Girl) दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी अपहरण (Abducted ) केल्याची घटना घडली होती. त्यामुळे सिन्नर तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अवघ्या काही तासातच सानवी सुखरूप मिळून आल्याने तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास सानवी घरासमोर खेळत असतांना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी तिला उचलून नेले होते. यानंतर बालिकेचे अपहरण झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच गावातील अनेक तरुण देवपूरमधून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर सदर बालिका व तिला पळवून नेणाऱ्या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते.

त्यानंतर अपहरणकर्त्यांनी सदर बालिका अवघ्या तासाभरात मीठ सागरे शिवारात रस्त्याच्या (Road) कडेला सोडून देत पळ काढला. यानंतर ही बालिका सुखरूप तिच्या आई-वडिलांकडे परतली असून तिला बघून पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम पोलिसांचा (Police) फौज फाटा घेऊन अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सातपूरला भवानी मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ

0
सातपूर । प्रतिनिधी Satpur सातपूर गावातील भवानी मातेचा यात्रोत्सव फायर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मोठ्या उत्साहात पार पडला. गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत (अर्धनारीनटेश्वर) श्रीगणेशाने बारागाड्या...