Friday, May 3, 2024
HomeUncategorizedचीनवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक ; ४७ अ‍ॅपवर बंदी

चीनवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक ; ४७ अ‍ॅपवर बंदी

मुंबई | Mumbai

भारत सरकारने पुन्हा एकदा चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 47 अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने 59 चिनी अ‍ॅप बंद केले होते. त्यात काही प्रसिद्ध अ‍ॅपही होते. त्यानंतर आता पब्जी आणि अली एक्सप्रेसचाही नंबर लागणार आहे.

- Advertisement -

या आधी टिक टॉक, वी चॅट, अली बाबा, यूसी न्यूज आणि यूसी ब्राऊझर सारख्या प्रसिद्ध अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली होती. 250 असे चिनी अ‍ॅप आहेत ज्यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे यांची चौकशीही केली जाऊ शकते. चिनी अ‍ॅप बॅन करण्यासाठी एक नवीन यादी तयार केली जात आहे आणि यामध्ये काही टॉप गेमिंग अ‍ॅप्स समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतात प्रसिद्ध पब्जी वर देखील बंदी घातली जाऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या