Sunday, September 22, 2024
Homeनाशिकजनतेबरोबरच शेतकरी सुखी व्हावा हाच शासनाचा अजेंडा - मुख्यमंत्री

जनतेबरोबरच शेतकरी सुखी व्हावा हाच शासनाचा अजेंडा – मुख्यमंत्री

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकार (Goverment) सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू ठरवूनच काम करते आहे. जनता व शेतकरी सुखी व्हावा, हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करत आहोत असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले…

नाशिकमध्ये डोंगरे (dongare) वस्तीगृहावर पाच दिवसांपासून सुरु असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाचा (World Agriculture Festival) समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत तेथील स्टॉल धारकांशी हितगुज केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दिंडोरी प्रणित श्री समर्थ मार्गाने अनेक शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. समाजाप्रति असलेली बांधिलकी समर्थ मार्गाने सांभाळली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येईल. यादृष्टीने सरकारसह समर्थ मार्गासारख्या अनेक माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होईल. हवामान बदल, दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी शासनाने एनडीआरएफची शिफारस डावलून अधिक मदत केली आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) दादा भुसे, अण्णासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, आबासाहेब मोरे, खा. हेमंत गोडसे,आ. बबन लोणीकर, आ.संजय शिरसाठ, आ. भरत गोगावले, आ. सुहास कांदे, आ.सीमा हिरे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे यांच्यासह आदी उपस्थित होते.

शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे

जागतिक कृषी महोत्सवाच्या समारोपात मुख्यमंत्री  शिंदे यांचे भाषण संपल्यानंतर सभागृहात उपस्थित शेतकरी सुकदेव सांगळे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या शेतकऱ्यास पोलिसांनी अडवत पुढे जाऊ दिले नाही. अखेर त्या शेतकऱ्याने प्रवेशमार्गावर मुख्यमंत्र्यांना गाठलेच.तो लांबूनच मुख्यमंंत्र्यांच्या दिशेने शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडू लागला.तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनीच त्याची भेट घेऊन त्याची व्यथा ऐकली. देशातील जनतेचे रक्षण ज्याप्रमाणे लष्कर करते, त्याप्रमाणेच देशवासीयांना शेतकरी अन्न देतो. त्या शेतकऱ्यांना मासिक मानधन,पेन्शन द्यावे, त्यांच्याकडे लक्ष दिले तरच हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, हे सिद्ध होईल,असे शेतकरी सांगळे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यांनीही त्यांचे समाधान होईल,असे उत्तर दिले अन् मार्गस्थ झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या