Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआज रंगणार ‘देशदूत’ आयोजित ‘ग्रामसेवक पुरस्कार 2023’ सोहळा

आज रंगणार ‘देशदूत’ आयोजित ‘ग्रामसेवक पुरस्कार 2023’ सोहळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात अनेक ग्रामसेवक सेवाकार्य करत आहेत. अशा कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवकांंच्या तळमळीला आणि कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘ग्रामसेवक पुरस्कार 2023’ सोहळा दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

आज (दि.27) राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते विविध तालुक्यांतील ग्रामसेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

‘देशदूत’च्या स्थापनेनंतर गेल्या 50 वर्षांची उत्तुंग परंपरा असून, ‘मनामनातील पानापानांत’ या संकल्पनेनुसार वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने जनमाणसाशी संवाद साधण्यासाठी, प्रत्येक पिढीसोबत असलेले नाते जपण्यासाठी, हॉटेल नासिक्लब, नासर्डी पुलाजवळ नाशिक-पुणे रोड येथे आज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पुरस्कार समारंभ पार पडणार आहे.

आपल्या कार्यातून गावाचा विकास करून वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणार्‍या व्यक्तिमत्त्वांचे कर्तृत्व जगासमोर यावे या हेतूने आयोजित ‘ग्रामसेवक पुरस्कार 2023’ या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘देशदूत’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या